साईमत जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पब्लिक स्कूल मध्ये नवीन शैक्षणिक वर्ष 2024 -25 या वर्षाची एक एप्रिल पासून उत्साहात सुरुवात झाली. सोमवार दिनांक १ एप्रिल रोजी शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या परिसरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती. शाळेच्या प्रवेशद्वारावरच सुंदर व आकर्षक अशी रांगोळी व फुग्यांची कमान बनवण्यात आली होती आणि विद्यार्थ्यांनी त्यामधून प्रवेश करतांना त्यांचे औक्षण करून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, प्रतिष्ठानचे सचिव व शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर गोरे, शाळेचे प्राचार्य प्रविण सोनावणे, शाळेचे प्रशासकीय अधिकारी मिलिंद पुराणिक, शाळेच्या समन्वयिका स्वाती अहिरराव , अनघा सागडे , सहसमन्वयक विकास कोळी, प्रदीप पाटील व इयत्ता पहिली व सहावीचे विद्यार्थी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
स्वाती देशमुख, गणेश देसले, रवींद्र भोईटे यांनी स्वागत गीत गाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्राचार्य प्रविण सोनावणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी जोकरच्या वेशभूषेत आलेल्या व्यक्तींनी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. यानंतर सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गाच्या प्रवेशद्वारासमोर प्रत्येक विद्यार्थ्यांचे औक्षण करून वर्गात स्वागत केले. कार्यक्रमाची जबाबदारी भारती माळी, अश्विनी बाविस्कर, अश्विनी पाटील, गणेश देसले यांनी पार पाडली.