साईमत जळगाव प्रतिनिधी
खान्देशाची तमाशा लोककला येथील लोक परंपरा व लोक साहीत्य व बोली भाषेनी समृध्द अशी लोककला आहे आहे खान्देशाच्या तमाशा परंपरेला शंबर वर्षाचा इतिहास असुन लोकाश्रया वर जिवंत असलेली लोककला काळ ओघात लोप पावत चाललेली आहे खान्देशाच्या तमाशा लोककलेला पुर्नवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर या लोककलेला राजाश्रया सोबतच लोकाश्रयाची गरज आहे असे राज्य शासनाचा स्व विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त खानदेशातील जेष्ठ तमाशा कलावंत भीमा सांगवीकर यांनी केले.
शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया मार्फत जळगाव येथे दिनांक १२ मार्च ते ३१ मार्च, २०२४ या कालावधीत तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिराचा समारोप जळगाव च्या भैया साहेब गंधे सभागृहात उत्साहात पार पडला.
या प्रसंगी जेष्ठ समाजसेवक व उद्योजक रजनीकांत कोठारी खान्देशातील जेष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील,शासनाचे जिल्हा वृध्द कलावंत मानधन समिती चे अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती च्या सदस्या गीतांजली ठाकरे जेष्ठ रंगकर्मी चितांमण पाटील, जेष्ठ तमाशा कलावंत नामदेव अंजाळेकर अदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रजनीकांत कोठारी यांच्या हस्ते शिबीरार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच शासनाने ओझर ता चाळीसगाव येथे आयोजित केलेल्या वहीगायन महोत्सवात सहभागी झालेल्या वहीमंडळ व वहिगायन लोककलावंताचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिबीर संचालक शेषरावव गोपाळ यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व अभार प्रदर्शन शिबीर सह संचालक तथा खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी केले.
तमाशा प्रशिक्षणासाठी स्थानिक तसेच बाहेरगावातील ३०विद्यार्थ्यांना सलग २० दिवस तमाशाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात आले. तमाशा प्रशिक्षण देण्यासाठी दिग्गज तमाशा कलावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
समारोपीय कार्यक्रमात तमाशा प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमार्फत विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला या प्रसंगी तमाशातील पारंपरिक गण, गवळण,बतावणी,लावणी व वगातील सखी सहभागी शिबीरार्थी विद्यार्थी यांनी सादर केला.
सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे तसेच सांस्कृतीक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तमाशा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण शिबीर व समारोपीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या कलावंतानी परिश्रम घेतले.