Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रावेर»बहिणीचे शिक्षण…घर घेण्याचे स्वप्न भंगले… २३ व्यावर्षी जयेश मराठेचे ह्दयविकाराने निधन
    रावेर

    बहिणीचे शिक्षण…घर घेण्याचे स्वप्न भंगले… २३ व्यावर्षी जयेश मराठेचे ह्दयविकाराने निधन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 28, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, रावेर : प्रतिनिधी

    हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची धडपड…लहान बहिणीचे शिक्षण…आणि परिवारासाठी नवीन घर घेण्याचे स्वप्न…घेऊन बारामती येथे खासगी कंपनीत जॉब करणाऱ्या जयेश मराठे याचे ह्दयविकारामुळे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. एकुलता एक मुलगा असल्याने बहिणीने स्मशानभुमीत जाऊन मुखाग्नीडाग दिला. जयेश मागील पंधरा दिवसांपूर्वीच पुणे येथून हॉस्पिटलमधुन ब्रेन स्टोनच्या झटक्यातून बरा होऊन नुकताच रावेर स्वगृही परतला होता. परंतु सकाळी अचानक छातीत दुखायला लागल्याने हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतांना त्याचे निधन झाले.

    सविस्तर असे की, नोकरीच्या शोधात पाच वर्षापूर्वी सोपान मराठे हे त्यांची पत्नी उषाबाई मराठे, मुलगी खुशी आणि एकुलता एक मुलगा जयेश याला घेऊन रावेर शहरात आले होते. आर्थिक चणचणीमुळे तीन वर्षापूर्वीच वडील सोपान मराठे यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे विधवा आई आणि लहान बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी जयेशच्या खांद्यावर आली होती. सर्व जबाबदारी घेऊन जयेश जीवनाचा प्रवास करत होता. कुटुंबाला आर्थिक चणचणमधुन बाहेर काढण्यासाठी जयेश बारामती येथे एका खासगी कंपनीमध्ये जॉब करत होता.कुटुंबासाठी नवीन घर घेण्याचे त्याचे स्वप्न होते. परंतु पंधरा दिवसापूर्वी त्याला डोके दुखण्याचा त्रास खुप जाणवायला लागला. त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला बारामती व तेथून पुणे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. त्याच्या सर्व तपासण्या केल्यावर त्याला ब्रेन स्टोनसारखी लक्षणे जाणवली. त्याची आई, बहीण, मामा हे पुणे येथे हॉस्पिटलला गेले. तेथे ऑपरेशन केले. त्यात त्याच्या तब्येतीत सुधारणाही झाली होती. उपचार पूर्ण झाल्यावर दोन दिवसांपूर्वी जयेश रावेर येथे त्याच्या आई व लहान बहिणीकडे आला होता. गुरुवारी सकाळी त्याच्या छातीत दुखायला लागले. त्याचे मामा त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतांना त्याचा त्रास जास्त वाढला. शेवटी जयेशने त्याचे मामा जितु महाजन, योगेश महाजन, किशोर महाजन याला म्हणाला, ‘माझी बहीण आणि आई यांचे कसे होईल’, असे म्हणत जगाचा निरोप घेतला.

    भाचाला वाचविण्यासाठी मामांच्या प्रयत्नाला अपयश

    जयेश मराठे याला वाचविण्यासाठी त्याचे मामा जितु महाजन, किशोर महाजन, योगेश महाजन पुणे येथील हॉस्पिटलमध्ये शर्तीचे प्रयत्न केले. पुण्यालाही हॉस्पिटलमध्ये त्याला सौम्य ह्दय विकाराचा झटका आला होता. परंतु वेळेवर उपचार मिळाल्याने तो बरा झाला होता. परंतु ब्रेनच्या आजारातून बरा होऊन नुकताच रावेरला त्याच्या घरी आला होता. परंतु गुरुवारी सकाळी मामा हॉस्पिटला घेऊन जात असतांना त्याचे निधन झाले. जयेशची आई मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. जयेशच्या अकस्मात मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Savda, Taluka Raver: भीषण अपघात भरधाव मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

    February 23, 2026

    Savda : सावदात भीषण आग! पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे आर्थिक नुकसान

    February 4, 2026

    Raver : रावेरजवळ समोरासमोर धडक; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.