धरणगाव महाविद्यालयात रासेयोतर्फे एक दिवसीय आरोग्य शिबिर

0
15

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात गुरुवारी, ७ मार्च रोजी महिला दिनानिमित्त पूर्वसंध्येला रासेयो, रेड रिबन क्लब आणि युवती सभेतर्फे एक दिवसीय आरोग्य शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.मयूर जैन, आयटीपीसीचे ज्ञानेश्‍वर शिंपी, राजेश काकडे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या महिला प्राध्यापिका डॉ.कांचन महाजन, डॉ.ज्योती महाजन, डॉ.सुषमा तायडे, प्रा.सुलताना पटेल, प्रा. श्रद्धा चौटे यांचा महिला दिनानिमित्त विद्यार्थी स्वयंसेवकांनी पुस्तक व बुके देऊन सत्कार केला.

शिबिरात डॉ.मयूर जैन यांनी ‘दंत आरोग्य तसेच स्त्री आरोग्य’ विषयावर मार्गदर्शन केले. तसेच ज्ञानेश्वर शिंपी यांनी एचआयव्ही एडस्‌बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी रेड रिबन क्लबद्वारे घेण्यात आलेल्या रांगोळी व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यात रांगोळी स्पर्धेत सपना माळी प्रथम तर रुपाली पाटील हिला दुसरे बक्षीस मिळाले तर निबंध स्पर्धेत भाग्यश्री पाटील प्रथम तर चेतन पाटील याला दुसरे बक्षिस मिळाले.

यशस्वीतेसाठी डॉ. बोंडे, प्रा. केंद्रे, प्रा. पालखे, प्रा.डॉ.गौरव महाजन, प्रा.विश्‍वजित वळवी, प्रा.योगेश पाटील, विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन तथा प्रास्ताविक एनएनएस प्रमुख कार्यक्रम अधिकारी तथा रेड रिबन क्लबचे समन्वयक डॉ. अभिजित जोशी तर आभार डॉ. ज्योती महाजन यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here