साईमत जळगाव प्रतिनिधी
नशिराबादला कोट्यवधीची कामे कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांची भक्कम साथ यामुळेच सर्वसमावेशक विकास होत आहे. मतदार हाच माझा समाज असून विकास हेच माझे ध्येय आहे. एकीकडे कामे सुरू असतांना तुम्ही विरोधाला विरोध म्हणून कितीही टिका करा; मी विकासकामे करत राहणार असून टिकेला विकासकामातून उत्तर देत आहे. ग्रामविकासात विघ्न आणणाऱ्यांना झूगारून विकास कामे करीत असून विकास कार्यात खोडा घालणाऱ्यांना जनता धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. 57 कोटीची पाणी योजना मंजूर झाली असून पाण्याचे आरक्षणावरील शिक्कामोर्तब झाला आहे. त्याचा जीआर सुद्धा याप्रसंगी दाखवण्यात आला. नाशिराबादाचा प्रत्येक माणूस हा “आपला माणूस” असल्याने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. लवकरच 70 कोटींच्याभुयारी गटारीचा प्रस्तावाला मान्यता मिळणार असून स्वच्छ व सुंदर माझे नशिराबाद बनविण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याची ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद करांना दिली. ते बस स्थानक चौकात विविध विकास कामांच्या लोकार्पण, भूमिपूजन व गृहपयोगी भांडे संच वाटप प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी सरपंच विकास पाटील यांनी पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या विकास कामांचा पाढाच वाचला, महिला आघाडीच्या सरिताताई कोल्हे- माळी, जि.प. चे उपाध्यक्ष लालचंद पाटील व जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पालकमंत्री मतदार संघाचा विकास साधत असल्याने त्यांच्या पाठीशी आपली खंबीर साथ असू द्या असे आवाहन केले.
या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, सरिताताई कोल्हे -माळी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिवसेनेचे माजी सरपंच विकास पाटील, शहर प्रमुख विकास धनगर, युवासेनेचे चेतन बऱ्हाटे , पी एस आय. रामेश्वर मोताळे, निळकंठ रोटे, प्रवीण पाटील, माजी उपसरपंच कीर्तीकांत चौबे, योगेश पाटील, चंद्रकांत भोळे , असलम सर , अनिल पाटील , भाजपाचे किरण पाटील, बापू बोढरे, क्रिक कल्ले, शाही बिरादरीचे सलीम शहा, विनायक वाणी, एड. प्रदीप देशपांडे, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, जनाआप्पा कोळी, रामकृष्ण काटोले, स्वप्नील परदेशी, प्रवीण परदेशी, देविदास कोळी, जितेंद्र पाटील , उपमुख्याधिकारी तन्वीर पटेल, लेखापाल दौलत गुट्टे, यांच्यासह नशिराबाद परिसरातील सरपंच, ग्रा. पं. सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक, पदाधिकारी शिवसेना – भाजपा युतीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वाघुर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी 57 कोटी 34 लक्ष निधीतून नगरोत्थान योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिलेली असल्याने नशिराबाद करांना दिलेला शब्द पाळला असून वाघुर धरणावरून शहरासाठी नशिराबाद करांची तहान भागविणार आहे.
नशिराबाद येथे निवडणुकीपूर्वीच विशेष रस्ता योजनेंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, गटार बांधकाम, पेव्हींग ब्लॉक बसविणे, ओपन स्पेस विकसित करून बगीचा तयार करणे व अद्यावत अग्निशमन केंद्र बांधकाम अश्या 31 विविध विकास कामासाठी 16 कोटींच्या कामांचे भूमिपूजन तसेचजिल्हा नियोजन मधून (डी. पी. डी. सी. मधून) मंजूर असलेल्या रस्ते, गटारी अश्या पायाभूत सुविधेकरिता 4 कोटींच्या कामांचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शहरातील बस स्टँड परिसरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले. तसेच नशिराबाद येथिल महिलांना १० हजाराच एक सेट या प्रमाणे सुमारे १५० महिलांना भांड्यांचा सेट पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात न.पा. चे मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांनी सुमारे 20 कोटींच्या मंजूर असलेल्या विविध विकास कामांचा अहवाल सविस्तरपणें विशद करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भरघोस निधी दिल्याबादाल आबर व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक राजेंद्र पाचपांडे यांनी केले तर आभार कार्यालयीन अधिक्षक संतोष रगडे यांनी मानले.