जामनेरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम उत्साहात

0
91

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

शहरासह तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला रविवारी, ३ मार्च रोजी उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी जामनेर नगरीच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते हिंदवी मुळे या तीन वर्षाच्या बालिकेस पोलिओ लसीचा डोस पाजून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण, व्ही.एच.माळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, डॉ.जयश्री पाटील, डॉ.कांचन पोटे, आशा कुयटे, बशीर पिंजारी, सोनल पाटील, अण्णा जाधव, गोपाळ पाटील, रवींद्र सूर्यवंशी, सुधाकर माळी, किशोर पाटील, संगीता पाटील, लता सुशिर उपस्थित होते.

तालुक्यातील शहरी १९ आणि ग्रामीण २०७ बुथद्वारे ३५ हजार १९८ बालकांना पोलिओ लसीचा डोस पाजण्यात आला. उर्वरित २ हजार ३१ बालकांना एक दिवसाच्या खंडानंतर पुढील तीन दिवस एकूण ७५ हजार ७९६ घरांना भेट देऊन आय.पी.पी.आय. मोहिमेद्वारे पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत. यासाठी २१५ टीमची स्थापना केली आहे. यासाठी ६५७ अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, सेवाभावी स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक केली आहे.

बालकांनी तीन दिवसात लसीचा डोस घ्यावा

ज्या पालकांनी काही कारणास्तव आपल्या शून्य ते पाच वर्षांच्या बालकांना पोलिओ लसीचा डोस दिला नसेल त्यांनी पुढील तीन दिवसात पोलिओ लसीचा डोस पूर्ण करावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here