केसीईच्या इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात रंगतोय क्रीडा महोत्सव

0
31

साईमत जळगाव प्रतिनिधी

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात सुरू आहे. यात विद्यार्थ्यांचे विविध खेळातील अथक, परिश्रम, मेहनत, क्रीडा कौशल्याचे दर्शन होतेय.

या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, प्राचार्य संजय सुगंधी यांच्या हस्ते एकलव्य क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर झाले. या क्रीडा महोत्सवात बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, क्रिकेट आदी स्पर्धा होत आहे. या स्पर्धा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक नितीन चौधरी यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहेत. या स्पर्धा प्रसंगी महाविद्यालयाच्या डिन प्रज्ञा विखार, डिन अँडमिनिस्ट्रेशन डॉ.श्रीकांत तारे, डिप्लोमा विभागाचे प्रमुख चंद्रशेखर पाटील, सचिन नाथ, जगदिश पाटील आदी उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वितेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी निशांत फिरके, चेतन पाटील, कौशल्य चौधरी, प्राध्यापक, कर्मचारी, खेळाडू विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here