साईमत जळगाव प्रतिनिधी
मेहरुणमधील साईबाबा मंदिरापासून संत नरहरी महाराजांच्या ७३८ व्या पुण्यतिथी निमित्त दि. २७ रोजी सायंकाळी संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे रमेश वाघ व मीना वाघ यांनी पूजन केल्यानंतर पालखी सोहळाला सुरुवात करण्यात आली.
समाज बांधवानी जागो – जागी पालखीचे पूजन केले. टाळमृदुंगाच्या तालावर ठेका धरत फुगडी खेळून उत्सव साजरा करण्यात आला. रामेश्वर कॉलोनीतील राज शाळेजवळील शिव नरहरी तीर्थ येथे गणेश सोनवणे, रंजना वानखेडे, राजेंद्र घुगे पाटील, विजय वानखेडे, गणेश दापोरेकर, राजेंद्र वडनेरे, संजय विसपुते, नंदू बागुल यांच्या हस्ते पालखीची सांगता महाआरती व प्रसाद वाटपाने करण्यात आली.
यावेळी संत नरहरी सोनार बहुद्देशिय संस्थेचे माजी अध्यक्ष प्रशांत सोनार, अध्यक्ष रमेश वाघ, उपाध्यक्ष जीवन सोनार, कार्याध्यक्ष यशवंत वडनेरे, सचिव जगदीश देवरे, सहसचिव बी. एस. पिंगळे, खजिनदार सुनील सोनार यांच्यासह राजेश बिरारी, केतन सोनार, समाधान सोनार, प्रकाश बाविस्कर, विजय सोनार, सुभाष सोनार, निलेश विसपुते, हर्षल सोनार, गणेश वानखेडे, नितीन बिरारी, प्रमोद सोनार, राहुल पोतदार, गणेश देवरे, दिगंबर निकम यांच्यासह समाज बंधू भगिनींची उपस्थिती होती.