चाळीसगाव महाविद्यालयातर्फे आय.टी. दिंडीचे आयोजन

0
47

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी.आर्टस्‌, एस.एम.ए. सायन्स, के.के.सी.कॉमर्स कॉलेज यांनी चाळीसगाव तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये जाऊन त्याठिकाणी संगणक साक्षरता (आय.टी.दिंडी) उपक्रम राबविला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर यांनी आय.टी.दिंडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करुन मार्गदर्शन केले. यावेळी ए.बी.मुलींचे हायस्कुलचे चेअरमन प्रदीप अहिरराव, उपप्राचार्य डॉ.अजय काटे, उपप्राचार्य प्रा. धनंजय वसईकर, आय.टी.दिंडी प्रमुख प्रा. दीपक आवटे, डॉ.योगिनी वाघ उपस्थित होते.

आय.टी.दिंडीचा उद्देश स्पष्ट करतांना जास्तीत जास्त तरुण मुलांनी संगणक शिकून इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावे. तसेच सोशल मीडिया आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहार करतांना आपण काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. अन्यथा सायबर क्राईमसारखे गुन्हे आपल्या हातून होऊ शकतात, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.एम.व्ही. बिल्दीकर यांनी केले.

चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जय तुळजा भवानी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ आश्रमशाळा मेहुणबारे, गिरणा विद्याप्रसारक शाळा खडकीसिम, देवळी आश्रमशाळा, प्राथमिक विद्या मंदिर, उपखेड या शाळांमध्ये जाऊन संगणकबद्दल आणि इंटरनेट व सायबर क्राईमबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यासाठी दोन टीम तयार करून त्यामध्ये प्रा.रश्‍मी साळुंखे आणि प्रा. हर्षदा मोरे प्रमुख होते. त्यांच्यासोबत मृणाली दंडगव्हाळ, नंदिनी पाटील, मनीषा पाटील, घनश्‍याम बडगुजर, दीपाली पाटील,हर्षदा पाटील, मैत्रीयी पाटील या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाग घेऊन ग्रामीण भागातील मुलांना संगणकाबद्दल माहिती दिली.

याप्रसंगी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद देऊन संगणकाविषयी माहिती जाणून घेतली. यशस्वीतेसाठी प्रा. माधुरी देशमुख, निकिता शिरुडे, यामिनी पाटील, सौरभ त्रिभुवन, शुभम पाटील यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here