जळगावच्या जलतरणपटूंची उत्कृष्ट कामगिरी

0
11

साईमत जळगाव प्रतिनिधी

गोवा येथील ६ वी नॅशनल मास्टर गेम – २०२४ मध्ये अॅक्वा स्पा कोकीळ गुरुजी म. न. पा. जलतरण तलावाचे जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडीयम गोवा येथे ६ वी नॅशनल मास्टर गेम २०२४ स्विमीगच्या स्पर्धा दिनांक ८ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत झाल्या. या स्पर्धेसाठी १८ राज्यातून स्विमींगच्या विविध क्रीडा प्रकारात स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.

सदर स्पर्धेत जळगाव शहरातील अॅक्वा स्पा कोकीळ गुरुजी म. न. पा. जलतरण तलाव येथील ५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यात राहुल अभंगे (३० ते ३५ वर्षेवयोगटात) १०० मीटर बॅक स्ट्रोक -प्रथम, १०० मी. ब्रेस स्ट्रोक- द्वितीय, ५० मी. फ्री स्टाईल-तृतीय, अविनाश वाकलकर (५० ते ५५ वर्षे वयोगटात) २०० मी फ्री स्टाईल-द्वितीय, ज्ञानेश्वर देशमुख (५० ते ५५ वर्षे वयोगटात) 50 मी. बटर फ्लाय-तृतीय, कमलकिशोर मणियार (६० ते ६५ वर्षे वयोगट) १०० 10 मी. ब्रेस स्ट्रोक-प्रथम, 100 मी. बॅक स्ट्रोक-द्वितीय , जयंतीलाल झंवर (७५ ते ८० वर्षे वयोगट) ५० मी बॅक स्ट्रोक-प्रथम, 50 मी ब्रेस स्ट्रोक-द्वितीय या पाचही स्पर्धकांचे अॅक्वा स्पा जलतरण तलावाचे संचालक सपन झुनझुनवाला , राजश्री झुनझुनवाला, मॅनेजर संजय विराणीया, कर्मचारी, लाईफगार्ड तसेच पोहण्यास येणारे सभासद आदींनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धकांना प्रशिक्षक राजेश नेवे, सारिका भोई. आर. आर. पाटील यांना स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here