पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा

0
30

साईमत जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट (पुरुष) स्पर्धेच्या बाद फेरीत चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात एमआयटी आर्ट अँड डिझाईन विद्यापीठ पुणे, सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ, आत्मिय विद्यापीठ राजकोट आणि मुंबई विद्यापीठ यांनी आपआपल्या गटातील सामने जिंकले. दरम्यान, दुपारच्या सत्रात महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदरा, डॉ.सुभाष विद्यापीठ, जुनागड आणि सरदार पटेल विद्यापीठ, गुजराथ हे तीन संघ विजयी झाले.

असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या वतीने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा दि. १८ फेब्रुवारी पासून सुरू आहेत. बुधवारी चौथ्या दिवसाच्या सकाळ सत्रात बाद पध्दतीने चार मैदानांवर चार सामने झाले. अ गटात डी. वाय पाटील विद्यापीठ पुणे विरूध्द एमआयटी आर्टस अँड डिझाईन विद्यापीठ पुणे यांच्यात सामना झाला. डी.वाय. पाटील संघ १७.२ षटकात ८४ धावा काढून बाद झाला. एमआयटी संघाने ९.२ षटकात ८५ धावा काढून एक गडी गमावत सामना ९ गडी राखुन जिंकला. प्रथम मट्टर हा सामनावीर ठरला.
ब गटाच्या सामना मुळजी जेठा महाविद्याल्याच्या एकलव्य क्रिडासंकुलावर झाला. हा सामना प्रवरा इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस रहाता, जि. अहमदनगर विरूध्द आत्मिय विद्यापीठ राजकोट यांच्यात झाला. प्रवराच्या संघाचे वीस षटकात ९ गडी बाद झाले. त्यांनी १०९ धावा केल्या. आत्मिय विद्यापीठाने १३.४ षटकात २ गडी गमावून ११२ धावा करीत ८ गडी राखून सामना जिंकला. मितूल मारू याने ५१ धावा काढल्या व ४ गडी टिपले तो सामनावीर ठरला.
क गटाच्या सामना अनुभुती इंटरनॅशनल शाळेच्या मैदानावर मुंबई विद्यापीठ विरूध्द सिम्बॉयसिस इंटरनॅशनल विद्यापीठ पुणे यांच्यात झाला. १९.५ षटकार सिम्बॉयसिसचा संघ ९८ धावा काढुन सर्वबाद झाला, मुंबई विद्यापीठाने त्याआधी ४ गडी गमावत १८६ धावा केल्या होत्या मुंबईचा संघ ८८ धावांनी विजयी झाला. ७७ धावा काढणारा मनल कांबळे हा सामनावीर ठरला.
ड गटाचा सामना विद्यापीठाच्या क्रिडासंकुलावर झाला. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठावर, सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाने ३ गडी राखुन विजय मिळवला. नांदेडच्या संघ १८८ धावात (१८.५ षटके) बाद झाला. पुणे विद्यापीठाने ७ गडी गमावून १३१ धावा केल्या. पुण्याच्या स्वप्नील फुलपगारने ५० धावा करीत सामनावीरचा किताब पटकावला.
दुपारच्या सत्रात महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदरा, डॉ.सुभाष विद्यापीठ, जुनागड आणि सरदार पटेल विद्यापीठ, गुजराथ हे तीन संघ विविध मैदानांवर झालेल्या सामन्यात विजयी झाले.
अ गटात महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदरा विरूध्द मारवाडी विद्यापीठ राजकोट यांच्यात सामना झाला. महाराजा सयाजीराव विद्यापीठाचा संघ १९.३ षटकात १५० धावा काढून बाद झाला. मारवाडी विद्यापीठाचा संघ अवघ्या ५८ धावांमध्ये १३.५ षटकात बाद झाल्यामुळे बडोदरा संघाने ९२ धावांनी सामना जिंकला. या स्पर्धेत बडोदराचा डॅक्स बी हा खेळाडू सामनावीर ठरला त्याने २४ धावा काढल्या व ३ गडी देखील बाद केले.
ब गटात डॉ.सुभाष विद्यापीठ जुनागडच्या संघाने १२ धावांनी सामना जिंकला. डॉ.सुभाष विद्यापीठाने २० षटकात १५६ धावा केल्या. तर इंद्रशिल विद्यापीठ २० षटकात १४४ धावा करू शकले. सुभाष विद्यापीठाचा रिधम नाकुम हा सामनावीर ठरला त्याने ३८ धावा काढल्या शिवाय ३ गडी टिपले.
ड गटात सरदार पटेल विद्यापीठाने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचा एकतर्फी पराभव केला. सरदार पटेल विद्यापीठाचे ८ गडी बाद झाले मात्र त्यांनी १९४ धावांचा डोंगर उभा केला. कर्मवीर भाऊराव विद्यापीठाचा संघ ६८ धावांमध्ये (१०.३) षटके बाद झाला. १२६ धावांनी सरदार पटेल विद्यापीठाचा संघ विजयी झाला. प्रितमनी दिप याने ८९ धावा केल्या तो सामनावीर ठरला.
विविध मैदानांवर डॉ. देवदत्त पाटील, डॉ. हसिन तडवी, डॉ.संतोष बडगुजर, डॉ.सचिन पाटील, प्रा.अक्तर खान, प्रा. विनिश चंन्द्रन, श्री. अरविंद देशपांडे, श्री. तनवीर अहमद. डॉ. सचिन झोपे, डॉ. किशोर पवार, डॉ. शैलेश पाटील, प्रा. अमर हटकर, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ. आनंद उपाध्याय, डॉ.नवनीत आसी, डॉ. संजय चौधरी, प्रा. संजय भावसार, प्रा.डॉ. व्ही.के.पाटील, प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, प्रा.डॉ.अमोल पाटील ही मंडळी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here