साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
संघटनेचे कुठलेही कार्य संघटनेतील एकता आणि सार्वमताच्या प्राधान्यावर अवलंबून असते. त्यासाठी ध्येय निश्चिती करा. कुठल्याही कार्यात निस्वार्थीपणे स्वतःला झोकून द्या तरच ध्येय निश्चिती साध्य होईल, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्या.संगीतराव पाटील यांनी केले. हे सांगताना त्यांनी काही उदाहरणे दिली. समृद्धी शिक्षक फाउंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त बोधचिन्हाचा अनावरण सोहळा मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या.तथा नंदुरबार सरदार सरोवर प्रकल्प तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष संगीतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते अध्यक्षीय मनोगतातून बोलत होते. त्यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक जामराव पाटील यांनी केला. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला न्या.संगीतराव पाटील यांनी माल्यार्पण केले.
यावेळी बोधचिन्ह ज्यांनी तयार केले ते संस्थापक सचिव, चित्रकार, कवी दिनेश चव्हाण यांचा सत्कार न्या.संगीतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दिनेश चव्हाण यांनी बोधचिन्हाची संकल्पना उलगडून सांगितली.
यावेळी बोधचिन्हास समर्पक बोधवाक्य देणारे संस्थापक-संचालक दिनेश मोरे यांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सतीश सूर्यवंशी यांनी संस्थेची ध्येय उद्दिष्टे सांगितली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, उपाध्यक्षा कामिनी पाटील, सचिव दिनेश चव्हाण, सहसचिव महेंद्र पवार, कोषाध्यक्षा प्रा. नीतादेवी चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत ठाकरे, संचालक जामराव पाटील, सोमनाथ चौधरी, दिनेश मोरे, दिलीप पाटील, भूषण बोरसे, मिना पाटील, सुवर्णा सूर्यवंशी, भूषण पाटील, साहिल दाभोडे, सर्वेश सूर्यवंशी, समृध्दी सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी समृध्दी शिक्षक फाउंडेशनच्या (एसएसएफ) कार्यकारी संचालक मंडळांने परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा सुत्रसंचलन प्रा. चंद्रकांत ठाकरे तर आभार कामिनी पाटील यांनी मानले.