काशिनाथ पलोड स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

0
27

साईमत जळगाव प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड मध्ये दिनांक १७ रोजी महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील , डॉ.हर्षल कुलकर्णी शाळेचे प्राचार्य प्रविण सोनावणे, शाळेच्या समन्वयिका स्वाती अहिरराव, अनघा सागडे, संगीता तळेले यांच्या हस्ते श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.
यानंतर ईश्वरी भावसार, यश महाजन, लावण्या चौधरी या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीची माहिती सांगितली. ऋषिकेश पाटील व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला व इयत्ता चौथी,सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी राजं आलं राजं आलं आणि युगत मांडली या गाण्यावर नृत्य सादर केले. मयूर ठाकूर , मधुर कुलकर्णी यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा करून मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यात शिवाजी महाराजांचे मनोगत व्यक्त. काव्या पगारे व आर्या पाटील, हर्षाली वीरकर यांनी जिजाबाईंची वेशभूषा करून मी जिजाऊ बोलते यात जिजाबाईंचे मनोगत व्यक्त केले. तर पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज व जिजाऊ साहेब यांच्या वरील प्रसंग सादर केले. पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र समजावून सांगितले.
शिवजयंती निमित्ताने शाळेमध्ये दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणश्री पवार व अक्षरा पाटील, श्रावणी कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अर्चना दुमे, छाया घाटोळ, पुनम पाटील, प्रियंका बिरारी या होत्या. आभार कुलसरी कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here