Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»रायसोनी” महाविद्यालयात “जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धां”चे उद्घाटन
    क्रीडा

    रायसोनी” महाविद्यालयात “जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धां”चे उद्घाटन

    SaimatBy SaimatFebruary 16, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिध

    जी. एच. रायसोनी स्पोर्ट अ‍ॅन्ड कल्चरल फाउंडेशनतर्फे जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविध्यालय तसेच सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या क्रीडांगणावर जिल्हाभरातील दिग्गज व उदयोन्मुख खेळाडू व पदाधिकाऱ्यांचा सहभागात शुक्रवारी तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. महाविद्यालयातील व स्कूलमधील या स्पर्धेत जिल्ह्यातील २०० खेळाडू सहभागी झाले आहेत.

    महाविद्यालयातील उद्घाटन कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व जी. एच. रायसोनी मेमोरियलच्या समन्वयिका अमितासिंग या उपस्थित होत्या, तर महाराष्ट्र खोखो असोसीएशनचे सचिव जयांशु पोळ, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच प्रवीण ठाकरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अलिशा खान तसेच जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्‍घाटन करण्यात आले.

    यावेळी प्रास्ताविक जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे व्यवस्थापक प्रशांत महाशब्दे, क्रीडाशिक्षक संजय चव्हाण, कमलेश नगरकर तसेच जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक जयंत जाधव व राहुल धुळणकर हे परिश्रम घेत आहेत. यावेळी शहरातील क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    रायसोनी पब्लिक स्कूल अंतर्गत विविध स्पर्धा

    जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात विविध गटातील विद्यार्थ्यांसाठी कॅरम, चेस, स्विमिंग, स्पीड स्केटिंग व बास्केटबॉल या जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात येणार असून यात रुस्तमजी‎ इंटरनॅशनल स्कूल, विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, ओरियन स्कूल, पोद्दार स्कूल, उज्ज्वल इंग्लिश स्कूल, जिजामाता स्कूल, गुरुकुल स्कूल, सेंट तेरेसा स्कूल, सेंट जोसेफ स्कूल, अनुभूती स्कूल, बोहरा‎ इंटरनॅशनल स्कूल, एसजीएस हायस्कूल, शिंदे इंटरनॅशनल स्कूल, बालविश्व स्कूल यासह पाचोरा व एरंडोल येथील विविध शाळांचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. तसेच विजेत्यांना १० हजार रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. या विविध स्पर्धाचे परीक्षण प्रवीण ठाकरे- बुद्धिबळ, आयशा खान- कॅरम व बबलू पाटील- बास्केटबॉल हे करणार आहे.

    रायसोनी महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा आविष्कार

    जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या प्रशस्त अश्या क्रीडांगणावर जळगाव जिल्हा सेव्हन अ साईड फुटबॉल असोसीएशनच्या मान्यतेने “फुटबॉल” स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्हातील एकूण ३१ संघांचा समावेश असून या स्पर्धेसाठी विजेत्यांना तब्बल ३५ हजार रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.
    या स्पर्धेत विनीत फुटबॉल क्लब, नंदुरबार फुटबॉल क्लब, भुसावळ फुटबॉल क्लब, स्टार्स युनायटेड फुटबॉल क्लब, अक्सा फुटबॉल क्लब, आझम अकॅडमी, अमळनेर फुटबॉल क्लब, एअर स्टिकर्स, नाहाटा बॉईज, सागर पार्क बॉईज, उस्मान युनायटेड, पारोळा फुटबॉल क्लब, गोदावरी इंजिनिअरिंग जळगाव, शिव कॉलनी फुटबॉल क्लब आदी संघाचा सहभाग असणार आहे. तसेच पंकज तिवारी, विजय निकम, आफताब आलम, आझम पटेल, शेख दानिश, निखील पाटील, सादिक अली हे फुटबॉल स्पर्धेचे परीक्षण करणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Yaval : शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी

    January 17, 2026

    Mumbai : ४६ पैकी ४६”चा पराक्रम आमदार राजूमामा भोळेंच्या नेतृत्वाला मुख्यमंत्र्यांची शाबासकी,

    January 17, 2026

    Pachora : विवाहितेच्या तक्रारीवर पतीसह सासरच्या सहाजणांविरोधात गुन्हा दाखल

    January 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.