साईमत, रायपूर, ता. जळगाव : वार्ताहर
येथील कै. घनश्याम जयराम राजपूत बहुउद्देशीय संस्था संचलित मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कुल येथे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. त्यात चिमुकल्यांनी विद्यार्थ्यांनी रामायण महाकाव्य, महानाटिका, अध्यात्मिक पौराणिक पवित्र महाकाव्य रामायण बाल महानाटिकाद्वारे कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुमित जोशी जामनेर, सचिन देशमुख, चाळीसगाव, संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र परदेशी, सचिव जयसिंग परदेशी, रायपुरच्या सरपंच रंजना सपकाळे, कुसुंबाचे सरपंच यमुना ठाकरे पोलीस पाटील रामसिंग परदेशी, उपसरपंच वसंत धनगर तसेच प्रवीण परदेशी (ग्रा.पं.सदस्य, माजी प्र.सरपंच तथा शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख), उषा परदेशी (ग्रा.पं. सदस्या, माजी उपसरपंच) पुष्पा परदेशी (ग्रा.पं. सदस्या, माजी उपसरपंच), शीतल परदेशी (ग्रा. पं.सदस्या, माजी उपसरपंच), संगीता इंगळे (ग्रा. पं.सदस्या), मानसिंग परदेशी (माजी उपसरपंच), सतीश पाटील, जगदीश पाटील (साई मॉल), प्रमोद घुगे, (ग्रा.पं.सदस्य, कुसुंबा समाजसेवक), भूषण पाटील. (ग्रा.पं.सदस्य, समाजसेवक), दिलीप परदेशी, विजय पाटील (तंटामुक्ती अध्यक्ष), सतीश परदेशी (ग्रा.पं. शिपाई), संदीप परदेशी, मनोज परदेशी आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन, दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. ‘देवा श्री गणेशा’ ह्या गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अध्यात्मिक रामायण महाकाव्य सादर करून उपस्थित सर्वांकडून दाद मिळविली.
कार्यक्रमासाठी मयूर परदेशी, ध्रुव भारुडे, लोमस मगर, महेश पाटील, विनोद पाटील, गोविंदा कोळी, शुभम कोळी, भरत सुतार, राहुल परदेशी, लोकेश परदेशी, सागर परदेशी, वासुदेव मोरे यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी सोनाली देसले, मयुरी मोरे, नम्रता बाविस्कर, भावना मोरे यांनी परिश्रम घेतले. आभार मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका भारती परदेशी यांनी मानले.