साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील तालुका किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे खेळाडू तुषार नानासाहेब चौधरी आणि धीरज संदीप आगोणे यांनी आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदक मिळविले आहे. त्यामुळे दोघांची आगामी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. याबद्दल यशस्वी खेळाडुंसह प्रशिक्षक अनिल मंगळकर यांचे कौतुक होत आहे.
दिल्ली येथील इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे नुकत्याच तिसरी वाको आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत जगभरातील २२ देशातील ८८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात भारताच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदक घेऊन अथक परिश्रम करून देशाला पदक मिळवून दिले.
