शिक्षकांसाठी ‘क्षमता वृध्दी प्रशिक्षण’ दिशा दर्शक ठरेल : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

0
53

साईमत जळगाव प्रतिनिधी

प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे. शिक्षकांसाठी ‘क्षमता वृध्दी प्रशिक्षण’ दिशा दर्शक ठरेल असे प्रतिपादन जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी केले. जिल्हास्तरीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विध्यमाने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात जिल्हास्तरीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल , डाएटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे , डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रतिभा भावसार, डॉ. सी. डी. साळुंखे, डॉ. जगन्नाथ दरंदले आदिंची उपस्थिती होती.
यावेळी संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल म्हणाल्या की, शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची असते त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरणार आहे. प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे. शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार द्यायचा असतो. तसेच शिक्षकांनी सध्याच्या शिक्षण प्रवाहातील नवतंत्रज्ञान आत्मसात करायला हवे असे सांगत त्यांनी यावेळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शैक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.
परिषदेचे संचालक, सहसंचालक, उपसंचालक सर्व अधिकारी यांच्या वतीने सर्व प्रशिक्षणार्थीना शुभेच्छा देण्यात आल्या. तीन दिवसीय प्रशिक्षणासाठी जिल्हाभरातून सुमारे २०० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले, तर अधिव्याख्याता डॉ. जगन्नाथ दरंदले यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here