साईमत जळगाव प्रतिनिधी
मनोरंजन,पानाफुलांवर लिहिलेल्या कविता ह्या क्षणिक आनंद देतात व काळाच्या प्रवाहात लुप्त होतात. परंतु “सलाम” पुस्तकातील कविता ह्या देशभक्ती, सामाजिक भान जागृत करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या कधीही नष्ट होणार नाहीत, सलाम कायम अजरामर राहतील, अशा शब्दात प्रसिद्ध कवयित्री तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा माया धुप्पड यांनी “सलाम” पुस्तकाची प्रशंसा केली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नुकताच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्राचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह सलाम प्रकाशित करण्यात आला.अल्पवाधित पुस्तक महाराष्ट्राभर लोकप्रिय झाला.”सलाम” पुस्तकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत.
सलाममध्ये कवितांचा समावेश असलेल्या काही कवींचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व सलाम पुस्तक भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे गौरव करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठकवी भगवान भटकर, मायाताई धुप्पड, प्रा.प्रकाश महाजन, गोविंद पाटील,निंबा बडगुजर,अशोक पारधे,पुष्पा साळवे,ज्योती राणे,प्रकाश पाटील,गोविंद देवरे,प्राचार्य शकुंतला चव्हाण,किशोर पाटील,प्रविण कहाणे,किरण पाटील,चित्रा पगारे, किशोर नेवे,अजय भामरे यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण, डी.बी. महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले तर किशोर पाटील यांनी आभार व्यक्त केले.