साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर
येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षक तथा पत्रकार हरिभाऊ राऊत यांना महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. धुळे येथील राजश्री शाहू महाराज नाट्यगृहात महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय व राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आणि शिक्षण परिषद आयोजित केली होती.
यावेळी माजी खासदार तथा राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, पोलीस उपाधीक्षक एल.एन.कानडे (नाशिक), सहकार भारतीचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख दिलीप पाटील यांच्या हस्ते पहूर येथील क्रीडा शिक्षक हरीभाऊ राऊत यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेतर्फे दिला जाणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सहपरिवार व सहकारी यांच्यासह सन्मानित करण्यात आले. यावेळी हरीभाऊ राऊत यांच्यासमवेत प्रतिभा राऊत, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका कल्पना बनकर, वडाळीचे सरपंच संजय बनसोडे, शंकर भामेरे, भगवान जाधव, चंदेश सागर, सादीक शेख आदींनी हा सन्मान स्वीकारला.
याबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, उपाध्यक्ष शांताराम पाटील, सचिव भगवान घोंगडे, संचालक अशोक बनकर, शंकर घोंगडे, लक्षण गोरे, ज्ञानेश्वर लहासे, सुकदेव गिते, समाधान पाटील, शेख युसुब, संचालिका वंदना वानखेडे, मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे यांच्यासह सर्व शिक्षक, पालकांनी कौतुक केले आहे.