साईमत जळगाव प्रतिनिधी
मराठा प्रीमियर लीग २०२४ क्रिकेट क्रिकेट स्पर्धा सागर पार्क येथे दिनांक १ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान सुरु होत्या दि. ११ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना अजय बाविस्कर आणि कंपनी व विनोद इंजिनियरिंग या संघ दरम्यान पार पडला. हा सामना अजय बाविस्कर आणि कंपनी या संघाने जिंकला.
या सामन्यात्त विनोद इंजिनियरिंग या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित १० षटकात १२१ धावा केल्या होत्या. त्याच्या उत्तरात अजय बाविस्कर आणि कंपनी या संघाने निर्धारित १० षटकात ४ गाडी गमावून १२२ धावा केल्या. या सामन्यात जय बाविस्कर आणि कंपनी च्या कर्णधार हितेश मराठे याने २३ चेंडूत ५८ धावा केल्या. हा सामना अजय बाविस्कर आणि कंपनी या संघाने जिंकला.
दरवर्षी प्रमाणे मराठा प्रीमियर लीग क्रिकेट क्रिकेट स्पर्धेत ३६ पुरुष संघ ४ महिला संघ असे एकूण ४० संघ सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धेचे समालोचन पद्माकर पाटील यांनी केले. त्यांनी साऊथ आफ्रिका, साऊथ इस्ट आशिया क्रिकेट सामान्यांनच्या समालोचनाचे काम केले आहे.
मराठा प्रीमियर लीग क्रिकेट २०२४ च्या बक्षीस वितरण सोहळ्या निमित्त मुख्य सत्कारार्थी बॉडी बिल्डर भारतश्री स्नेहा कोकणे – पाटील यांनी महिला व मुलींना स्वरक्षणाचे धडे दिले. त्या म्हनाल्या की, मी एक मराठा समाजाची महिला आहे. स्पेन येथे जाऊन भारताचे नावलौकिक करते हे माझ्या साठी व भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी ॲड. उज्वल निकम ,आ. सात्यजित तांबे, रोहित निकम यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
अंतिम सामन्यानंतर बक्षीस समारंभ पार पडला. यात प्रमुख अतिथी ॲड. उज्वल निकम, आ. सात्यजित तांबे, आ. मंगेश चव्हाण , मराठा प्रीमियर लीग २०२४ च्या अध्यक्ष जागतिक बॉडी बिल्डर स्नेहा कोकणे – पाटील, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील , किरण बच्छाव, रोहित निकम, प्रमोद नाना पाटील, श्रीराम पाटील, शिवराज पाटील, गोपाळ दर्जी, निलेश पाटील , बाळासाहेब सूर्यवंशी, रश्मी कदम , लीना पवार , राहुल पवार आदिंची उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वतेसाठी आयोजन समितीने परिश्रम घेतले.