भुसावळला शिवजयंती उत्सव समिती जाहीर

0
30

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

येत्या १९ फेब्रुवारी रोजी तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळ शहरात शिवजयंती समिती स्थापन केली आहे. त्यात शिवजयंती समितीच्या अध्यक्षपदी लव झाडगे तर कार्याध्यक्षपदी चेतन सावकारे यांची निवड केली आहे.

शहरातील सर्वपक्षीय व सर्व संघटनांची बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी भाजपाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी होते. यावेळी राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, मनसेचे शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, शिवसेना उ.बा.ठा गटाचे शहर प्रमुख दीपक धांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे, युवा आधार प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष रितेश नायके आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.

शिवजयंती उत्सव समिती-२०२४ भुसावळची कार्यकारिणी अशी अध्यक्षपदी लव वामन झाडगे, उपाध्यक्षपदी चेतन तळेले, जोहेब सैय्यद, राहुल सोनवणे, पवन मेहरा, सचिव रितेश नायके, सहसचिव राजु कोळी, खजिनदार शुभम सोयंके, कार्याध्यक्ष चेतन सावकारे, रविंद्र तांबे, सल्लागार युवराज लोणारी, सदस्यांमध्ये प्रवीण पाटील, पवन ढंढोरे, सौरभ पवार, सागर वाघोदे, प्रतीक भंगाळे, सुरज चौधरी, हर्षल मराठे यांच्यासह भुसावळ शहरातील सर्व आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here