साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात ‘नमो’ चषकनिमित्त लोहारा विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन स्नेहदीप गरुड, कैलास चौधरी, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषिभूषण विश्वासराव पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. स्पर्धेत मुला-मुलींची स्वतंत्रपणे मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या चित्रकला, रांगोळी तसेच विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.
यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष ए.ए.पटेल, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य सुरेश चौधरी, उत्तमराव शेळके, डॉ.देवेंद्र शेळके, शिवराम भडके, वरिष्ठ पत्रकार महेंद्र शेळके, विकास देशमुख, राहुल कटारिया, संजय पाटील, शरद देशमुख, पी.व्ही. जोशी, पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मंडळी, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके, पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक आर.जी.बैरागी, आर.सी.जाधव, पी.यु.खरे, एच.डी.पाटील, पी.ए.सोनार यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.