साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित जे.ई.स्कुल येथे दहावीतील विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. यावेळी संस्थेच्या चेअरमन ॲड. रोहिणी खडसे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मनोगतातून शाळा व शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक पुरुषोत्तम महाजन, चंद्रशेखर बढे, मारुती बढे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, स्पर्धाही निकोप असावी. परिश्रमाशिवाय यश मिळत नाही, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव डॉ.सी.एस.चौधरी यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य आर.पी.पाटील यांनी परीक्षेबाबत महत्त्वाच्या सूचना देऊन विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेचे आवाहन केले. प्रास्ताविकातून उपप्राचार्य जे.जे.पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आरोग्य सांभाळून भयमुक्त परीक्षेला सामोरे जावे, असे मार्गदर्शन केले.
यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक व्ही.डी.बऱ्हाटे, एस.आर.महाजन, एस.पी.राठोड यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन एस.आर.ठाकूर यांनी केले.