भाजपातर्फे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

0
35

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

येथील भाजपाच्या कार्यालयाबाहेर उपस्थित असणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष यश संचेती यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांनी केलेल्या जातीवाचक वक्तव्याचा ‘जोडे मारो’ आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला.

राहुल गांधी यांनी एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली जात बदलल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विधानावर जोरदार टीका करत भारतीय संविधान आणि समाजाच्या आदर्शांच्या विरोधात असल्याचे मानले आहे. समाज बिघडविणाऱ्या आणि लोकांमध्ये मतभेद पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा विचारांना विरोध करणार असल्याची ग्वाही आंदोलनातून दिली गेली. भारतीय राज्यघटनेच्या आदर्शांशी पूर्ण बांधिलकीचे प्रतिबिंब म्हणून आंदोलन महत्त्वाचे ठरले आहे.

आंदोलनावेळी मोहन शर्मा, शंकरराव पाटील, अमृत बोबटकर, बबलू देशमुख, संजय काजळे, योगेश पटणी, मिलिंद डवले, विजय अढाव, शुभम बोबडे, विनोद आकोटकर, विशाल माधवानी, बबलू जमदार, रवी वानखडे, अजय नांदुरकर, निलेश जैस्वाल, देवीन टाक, दुर्गेश राजापुरे, अमोल टप, रवींद्र रायपुरे, गोपाल पाटील, गावत्रे यांच्यासह भाजयुमोचे मलकापूर शहर, ग्रामीणचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here