युवकांनी गांधी विचारांच्या प्रसारासाठी समाज माध्यमाचा प्रभावी वापर करावा – अंबिका जैन

0
17

साईमत जळगाव प्रतिनिधी

ग्राम संवाद युवकांनी गांधी विचारांच्या प्रसारासाठी समाज माध्यमाचा नाविन्यपूर्ण रीतीने प्रभावी वापर करावा असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अंबिका जैन यांनी केले. ग्राम संवाद सायकल यात्रेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते अब्दुलभाई, समन्वयक उदय महाजन, प्रा. डॉ. अश्विन झाला, यात्रा समन्वयक गिरीश कुलकर्णी, सुधीर पाटील व यात्रा प्रमुख प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते.

आपल्या मनोगतात अंबिका जैन पुढे म्हणाल्या की, ग्राम संवाद यात्रेचे अनुभव ऐकताना मलाही यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. बारा दिवसात आपण सर्व एकाच परिवाराचे सदस्य झालात हि खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आमच्या जैन परिवारातही वेगवेगळ्या वयोगटातील १८ सदस्य एकत्रित राहतात याचा अनुभव दैनंदिन जीवनात मिळत असतो असेही त्या म्हणाल्या. सर्व सायकल यात्रींचे त्यांनी अभिनंदन केले व आपण केलेले कार्य नक्कीच परिवर्तन घडवेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात वैभव सत्रे याने गायलेल्या भजनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला सुती हार घालून अभिवादन करण्यात आले. गिरीश कुळकर्णी यांनी प्रास्ताविकात समाजाच्या पाठबळामुळे हि सायकल यात्रा यशस्वी झाली व तिचा उद्देश सफल झाला असे म्हटले. यानंतर आकाश ढाकरगे, मनेष सोनटके, सातीका पवार, वैभव सत्रे, निखिल पवार, श्रद्धा कोंबे, चंदिगढ येथील अरमान अंगारा यांनी अनुभव कथन केले. अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, आत्मविश्वास वाढला, आमची नव्याने ओळख झाली व आमच्यातील क्षमतांची जाणीव झाल्याचे सांगितले.
यानंतर कोल्हापूर येथील शिवाजी कोकणे यांनी सायकल यात्रेचे सादरीकरण केले. सायकल यात्रेत दीपक मिश्रा, सुरेश पाटील, विश्वजीत पाटील, श्रीराम खलसे, भूषण इखार, विशाल टेकावडे, मयूर गिरासे, चंद्रकांत चौधरी, विक्रम अस्वार, भिका पाटील, वाल्मिक सैंदाणे, विनोद पाटील, अनिल वळवी, कुणाल पवार, रोशन नागले, प्रशांत ठोंबरे, संगीत राठोड, वैभव जाधव, पृथ्वीराज राठोड, अनिकेत मोकलकर, विनायक बुधवंत, बिहार येथील सौरभकुमार, नेपाळ येथील दीपराज भट्टराय, समता वासे, छत्तीसगड येथील शालिनी बनिक, पूजा उईके यांचा सहभाग होता. उदय महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. अब्दुलभाई यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देण्यात आली. ग्राम संवाद यात्रेचे गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डॉ. गीता धर्मपाल, तुषार बुंदे, चंद्रशेखर पाटील, निवृत्ती वाघ, अशोक चौधरी, योगेश संधानशीवे, प्रदीप मराठे, अदिती त्रिवेदी, साक्षी भामरे आदींनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here