“जैन चैलेंज चषक” जिल्हा आंतर शालेय बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात

0
17

साईमत जळगाव प्रतिनिधी

जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव द्वारे प्रायोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन द्वारे अधिकृत “जैन चैलेंज चषक” जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धा – २०२४. चे आयोजन दिनांक ९ ते १० फेब्रुवारी दरम्यान अनुभूती निवासी स्कुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या स्पर्धांमध्ये १७ वर्षाआतील वयोगटातील मुले व मुलींचे एकूण ३३ संघांनी सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या शाळांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव कडुन बक्षिस म्हणुन आकर्षक चषक व खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी तसेच तायक्वांडो प्रशिक्षक अजित घारगे व बुद्धिबळ प्रशिक्षक सोमदत्त तिवारी यांच्या हस्ते देण्यात आले.
स्पर्धे साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह यांनी मुख्य पंच म्हणून तर दीपिका ठाकूर, सुफयान शेख, ईशांत साळी, रौनक चांडक, आर्य गोला, हमजा खान, पुनम ठाकुर, फाल्गुनी पवार, जाजिब शेख, शुभम पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.
अंतिम निकाल
१७ वर्षाआतील मुले प्रथम – पोदार इंटर नॅशनल स्कूल, चाळीसगाव, द्वितीय – अनुभूती स्कुल (निवासी), जळगाव, तृतीय – सेंट. टेरेसा हायस्कूल, जळगाव.
१७ वर्षाआतील मुली प्रथम – पोदार इंटर नॅशनल स्कूल, जळगाव, द्वितीय – सेंट. लॉरेन्स हायस्कूल, जळगाव, तृतीय – तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव
या स्पर्धेतील विजेते शाळांचे संघाना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन , जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here