भुसावळला अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त २५ ला जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धा

0
18

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत, या हेतुने भुसावळ येथील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी जळगाव जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेचे रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी आयोजन केले आहे. यंदा स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. ही स्पर्धा पाच गटात होणार आहे. प्रत्येक गटातील तीन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कमेसह स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येइल. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे.

ही स्पर्धा रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजता भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कुल, नहाटा कॉलेज शेजारी, जामनेर रोड येथे होणार आहे. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी प्रकल्प प्रमुख देव सरकटे-८९८३६१०९१७, प्रकल्प समन्वयक समाधान जाधव ९०२२४६४९८१, सह समन्वयक अमित विजय चौधरी ९४२१७४१८२४, सह समन्वयक सचिन पाटील ७३०४०१७२१७ यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत नावनोंदणीची अंतिम तारीख मंगळवारी, २० फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. स्पर्धेच्या दोन फेऱ्या असतील. प्रथम फेरी झाल्यानंतर त्यातून प्रत्येक गटातून १० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यानंतर दुसरी फेरी ही भुसावळ शहरात घेतली जाईल. यावेळी निवड झालेल्या स्पर्धकाला पुन्हा तोच विषय सादर करावा लागेल. त्यातून अंतिम निकाल जाहीर केला जाईल आणि त्याच ठिकाणी त्याच दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला जाईल.

पाच गटासाठी असे असतील विषय

पहिल्या गटात इयत्ता पहिली आणि दुसरी २ मिनिट, विषय : ‘छत्रपती शिवाजी महाराज’, दुसरा गट इयत्ता तिसरी आणि चवथी, ३ मिनिट, ‘शिवरायांचे बालपण, माता जिजाऊ’ आणि ‘बाल शिवाजी, महाराजांच्या शौर्याचे प्रतीक-प्रतापगड’, तिसरा गट इयत्ता पाचवी ते सातवी, ४ मिनिट, ‘शिवरायांचे शूरवीर मावळे, शिवरायांची गुणग्राहकता, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज’, चवथा गट इयत्ता आठवी ते दहावी, ५ मिनिट, ‘राज्याभिषेक शिवछत्रपतींचा, आज शिवराय असते तर, शिवरायांची युद्धनीती’, पाचवा गट खुलागट ७ मिनिट, ‘छत्रपती शिवाजी महाराज- द मॅनेजमेंट गुरु’, ‘शिवशाही ते लोकशाही’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ’, ‘शिवकालीन किल्ल्यांचे भू- सामारिक महत्त्व’ असे विषय असतील.

उपक्रम समितीत यांचा आहे समावेश

उपक्रम समितीत ज्ञानेश्‍वर घुले, योगेश इंगळे, डॉ.संजू भटकर, जीवन महाजन, प्रसन्ना बोरोले, प्रदीप सोनवणे, विक्रांत चौधरी, अमितकुमार पाटील, शैलेंद्र महाजन, प्रा.डॉ.शामकुमार दुसाने, भूषण झोपे, हितेंद्र नेमाडे, राजेंद्र जावळे, राजू वारके, कुंदन वायकोळे, तेजेंद्र महाजन, राहुल भारंबे, ललित महाजन, निवृत्ती पाटील, जीवन सपकाळे, हरीश भट, संदीप रायभोळे, प्रमोद पाटील, मंगेश भावे, उमेश फिरके, केतन महाजन, चंद्रकांत सूर्यवंशी, गणेश जावळे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here