साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर
जामनेर तालुक्यातील एकुलती बु. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादित करत एनएमएमएसच्या परीक्षेत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएसची परीक्षा नुकतीच घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तीर्ण होऊन एकुलती गावात यशाचा तुरा रोवला आहे.
एनएमएमएसच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये डिंपल दीपक कोळी -गुण १२९, प्रसाद गजानन कोळी-गुण ७६, दिव्या समाधान राऊत -गुण ७२, दीपाली किसन कोळी-गुण ६६ तर प्रीती दशरथ सुरवाडे- गुण ६९ यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना उपशिक्षक गणेश कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या यशाबद्द्ल गटशिक्षणाधिकारी राम लोहार, विस्तार अधिकारी विजय सरोदे, शालेय पोषण आहारचे अधीक्षक विष्णू काळे, केंद्र प्रमुख किशोर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन शिंदे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मगरे, शिक्षकांसह पालकांनी कौतुक केले आहे.