‘सिझनेबल’ पुढाऱ्यांना जनता थारा देत नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
13

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

जलजीवन मिशन योजना सामन्यांचे जीवन सुकर करणारी आणि जनतेला वरदान ठरणारी आहे. लहान मोठे पुलांचे काम करून रस्त्यांचे जाळे विणले आहे. त्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या रस्त्यांना प्राधान्य दिले आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार गोरगरीबांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. हनुमंतखेडा येथे उर्वरित रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसवून १०० टक्के पेव्हिंगचे गाव करणार असल्याची ग्वाही दिली. ‘सिझनेबल’ पुढाऱ्यांना जनता थारा देत नसून जनता त्यांचा ‘टांगा पलटी घोडे फरार’ कधी करेल सांगता येत नसल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हनुमंतखेडा येथे विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सत्कार केला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुलभूत सुविधेंअंतर्गत (२५१५) गावअंतर्गत काँक्रीटीकरण १४ लाख, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत पथदिवे ७.५० लाख या कामांचे लोकार्पण करण्यात आले तर सुरू असलेल्या ८८ लाखांच्या पाणीपुरवठा योजनेची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. त्यात दोन पाण्याच्या टाकी, एक विहीर, गावात पाईपलाईन, पंप हाऊस अशा कामांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, गजानन पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. येथील शाखा प्रमुख सुनील पाटील यांची मुलगी व नुकतीच पोलीस भरतीत मेरीटला आलेली दिव्या पाटील हिच्या भाषणाने पालकमंत्र्यांसह मान्यवर व ग्रामस्थ भारावून गेले. तिचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कौतुक करून तिचा सत्कार केला.

यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानन पाटील, माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, सचिन पवार, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव नन्नवरे, सरपंच हुकुम पाटील, उपसरपंच विक्रम सोनवणे, शाखा प्रमुख सुनील पाटील, रतीलाल पाटील, ग्रा.पं. सदस्य रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, समाधान पाटील, किशोर सोनवणे, दीपक पाटील, परिसरातील सरपंच गोरख पाटील, आबा पाटील, निशांत पाटील, बंटी पाटील, युवासेनेचे पवन पाटील, किरण पाटील, दीपक भदाणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन भैय्या मराठे तर आभार शाखा प्रमुख सुनील पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here