साईमत, चोपडा : प्रतिनिधी
जीवन हे अनेक समस्यांच्या काट्याकुट्यांनी भरलेले आहे. त्यावर पुढे पुढे चालत राहणे हा एकच पर्याय आहे. त्यात गरिबीचे ओझे आडवे येऊ देऊ नका, ते बाजूला सारून शैक्षणिक प्रगती साधल्यास तुम्ही एक दिवस सुखाची फळे नक्की चाखणार. त्यामुळे खचून न जाता जीवनात शैक्षणिक संघर्ष करा, असे मार्गदर्शन डॉ.सतिष बेहडे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना केले. ते कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
त्रिशा फाउंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष डॉ.सतिष बेहडे यांनी गरजू आदिवासी विद्यार्थिनींची भेट घेत प्रत्येकास ब्लॅकेटसह खाऊचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले. याप्रसंगी डॉ.प्रियंका बेहडे, उद्योगपती राजेंद्र मणियार, राधिका मणियार, जयेश बेहडे, संस्थेचे अध्यक्ष महेश शिरसाठ, अधीक्षिका कावेरी कोळी, कर्मचारी शुभम साळुंखे यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.