साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील राघवेंद्र ग्रुपचे ॲग्नेस इंटरनॅशनल स्कुल आणि जेएमसीई डिप्लोमा कॉलेजमध्ये शालेय संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाला विनोदी अभिनेते भाऊ कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या खास शैलीतील विनोदातून उपस्थित चाहत्यांसह विद्यार्थ्यांची मने जिंकली.
अभिनेते भाऊ कदम यांच्या समवेत कर्नाटकचे माजी आमदार मनोहर ऐनापुर, साऊथचे कलाकार राहुल ऐनापूर, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती वनमाला राठोड, डॉ.शुमा राठोड, निखिल राठोड आदी उपस्थित होते. तसेच मराठी अभिनेते साहेबराव काळे, नगरसेविका सविता राजपूत, सामाजिक कार्येकर्ते योगेश पाटील यांच्यासह प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, पालक उपस्थित होते.