फैजपूर : प्रतिनिधी
येथील पोलिसांनी बुधवारी नाका-बंदी दरम्यान एका वाहनासह चार गोवंश जातीचे गुरे अवैधरित्या वाहून नेत असताना ताब्यात घेतली मात्र पोलिसांना पाहून वाहन चालक फरार झाला आहे. वाहन चालकाचे नाव रईस खान हमीद खान रा. न्हावी असे असून त्याच्या ताब्यातून एक लाखाचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहन तसेच अठरा हजाराची चार गुरे असा तब्बल एक लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे.
बुधवारी पोलिसांची नाकाबंदी असताना येथील छत्री चौकात फौजदार मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पोलीस नाईक किरण चाटे, बाळू भोई, हे तपासणी करीत असताना एक टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहनात गोवंश जातीचे चार गुरे, त्यात दोन गाई व दोन वासरू अशी अवैधरित्या घेऊन जात असताना वाहनचालकाने पोलिसांना पाहताच वाहन सोडून धूम ठोकली. पोलिसांनी सदरचे वाहन व त्यातील चारही गुरे ताब्यात घेतले.
गुरे हे आमोदा येथील गोशाळेत सुरक्षितरित्या पोहोचवण्यात आली तर वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वाहन चालक रईस खान हमीदार खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून तपास सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर, हे.कॉ. उमेश चौधरी करीत आहे.