यावल महाविद्यालयातील रोजगार मेळाव्याला प्रतिसाद

0
14

साईमत, यावल : प्रतिनिधी

शहरातील फैजपूर रस्त्यावरील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलीत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी, २३ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात बेरोजगार विद्यार्थ्यांनी मुलाखती देऊन प्रतिसाद दिला. त्यात बेरोजगार तरूणांनी विविध ११ कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळास मुलाखती दिल्या. त्यातील काही गरजुंना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले. मेळाव्याचे आयोजन आश्रय फाउंडेशन, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जळगाव यांच्या विद्यमाने केले होते. सकाळपासून मेळाव्याला जिल्ह्याभरातून तरूणांनी उपस्थिती दिली.

मेळाव्यापूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे होत्या. मेळाव्याचे उद्घाटन आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे संचालक सुनील भोईटे, यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड, कौशल्या विकास विभागाचे सहायक आयुक्त विजय रिसे, श्रीकांत लांबोळे, आश्रय फाउंडेशनचे सचिव डॉ. पराग पाटील, कौशल्य विकास मंत्रालय मुबंईचे प्रतिनिधी दिनेश बारेला, अरुण ठाकरे, सुभाष कदम, महेश चौधरी, दीपक बोरसे, उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार, उपप्राचार्य अर्जुन पाटील, प्रा.सी.के. पाटील, प्रा.आर.एस.तडवी, प्रा. ए.जी.सोनवणे, प्रा.इ.आर. सावकार, प्रा.एम.एच.पाटील, प्रा.एस.व्ही.कदम, प्रा.आर. एस. थिगळे, प्रा.नंदकिशोर बोदडे, प्रा.डॉ.संतोष जाधव, प्रा. सी.के.वसाणे, सागर लोहार, मनोज बारी यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक, इतर कर्मचारी उपस्थित होते.

मेळाव्यात ६९४ च्यावर रिक्त जागेसाठी जळगाव जिल्ह्यातील स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल लिमिटेड बाबा राजपूत, हिताची अष्टमी इंडिया हितेश नन्नवरे, जैन फार्म फ्रेश फड्स भीकेश जोशी, सुप्रीम इंडस्ट्रीज, क्रेडिट एक्सेस ग्रामीण राजू पाटील, स्टार फेब्रीकेटर्स कॅटर्स एम.आय. डी.सी.जळगाव, सिग्मा फॅसिलिटी जळगाव सचिन पवार, एल.आय.सी.ऑफ इंडिया जळगाव जितेंद्र सैदाने, राईट सिस्टीम अँन्ड सॉफ्टवेअर जळगावचे मंदार व्ही शांडिल्य, आय. टी.एम.जळगाव अविनाश भडाने, समर स्टील इंडस्ट्रीज या कंपन्याच्या प्रतिनिधींनी उपस्थित तरूणांच्या मुलाखती घेतल्या. त्यातील काही गरजु उमेदवारांना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here