Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»अतिक्रमित जागेवर ताबा करुन मायलेकांसोबत तिघांनी अडविला रस्ता
    क्राईम

    अतिक्रमित जागेवर ताबा करुन मायलेकांसोबत तिघांनी अडविला रस्ता

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 22, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

    तालुक्यातील लोणवडी येथील गेल्या ३५ वर्षांपासून रहिवासी असलेल्या शासकीय जागेवर भर रस्त्यात मायलेकांसोबत तिघांनी अतिक्रमण करून रस्ता अडविल्याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अपंग रामा धोंडू दोळे यांच्यासह सात जणांनी एका निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. पाच दिवसात ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी परिवारासह मलकापूर येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दोळे परिवाराने २१ जानेवारी २०२४ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

    निवेदनात नमूद केले आहे की, दोळे परिवार गेल्या ३५ वर्षापासून लोणवडी येथे राहत आहे. वापराच्या रस्त्यात दिनकर निना दोळे याने टिन पत्राचे घर बांधून रस्ता अडविला आहे. वास्तविक पाहता दिनकर दोळे याचे गावात पक्के घर आहे. त्याने सरकारी जागेत अतिक्रमण करून रस्ता अडविला आहे. दिनकर दोळे याने ग्रामपंचायतीच्या नमुना आठ ‘अ’ पेक्षा जास्त प्रमाणात जागा ताब्यात घेतली आहे. तसेच देवकाबाई जयंत बावस्कर यांना शासकीय जागेवर घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. देवकाबाई हिने ग्रा.पं.च्या नमुना ८ ‘अ’ पेक्षा जास्त जागा ताब्यात घेतल्याने जाण्या-येण्याचा रस्ता अडविला आहे. तिचा मुलगा दिलीप जयंत बावस्कर याचा ग्रामपंचायतमध्ये शासकीय जागेवर कुठलाही नमुना आठ ‘अ’ नसतांना तो सरकारी जागेवर बांधकाम करून रस्ता अडवित आहे. ग्रामपंचायतने दिलीप बावस्कर यांना बांधकाम करण्याची परवानगी दिली आहे ? परवानगी दिली असल्यास ग्रा.पं.मधील त्याच्या जागेची, नमुना आठ ‘अ’ ची माहिती लेखी देण्यात यावी, अशी मागणी दोळे परिवाराच्यावतीने केली आहे.

    रामा धोंडू दोळे याचा दोन वर्षांपूर्वी झालेल्या मोटार सायकलच्या अपघातात उजवा पाय निकामी झाला आहे. जाण्या-येण्याचा रस्ता दिनकर दोळे, देवकाबाई जयंत बावस्कर व आता नव्याने अतिक्रमण करुन दिलीप जयंत बावस्कर हा अडवित आहे. या तिघांनी कायदा व सुव्यवस्था धाब्यावर टांगली आहे. त्यांना सरपंच, पोलीस पाटील, बिट जमादारासह तिघांचे अभय असल्याने ते आजमितीला राजरोसपणे भर रस्त्यात बांधकाम करून अतिक्रमण करीत आहेत.

    पं.स.अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी तिघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करुन ग्रामपंचायतला नोंद असलेल्या नमुना आठ ‘अ’प्रमाणे त्यांची जागा मोजून त्यांच्या ताब्यातील अतिक्रमित जागा शासनाच्या ताब्यात घेऊन परिवाराचा वहिवाट करण्याचा रस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२४ रोजी परिवारासह मलकापूर येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा लक्ष्मण धोंडू दोळे, रामा धोंडू दोळे, तुषार रामा दोळे, पवन लक्ष्मण दोळे, दिलीप रामा दोळे, सागर रामा दोळे आदींनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी पंचायत समिती मलकापूर, ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना दिल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Malkapur : अभियंत्यांच्या आशीर्वादाने निकृष्ट कामे?

    December 20, 2025

    Malkapur : राष्ट्रीय विद्यालय पिंप्रीगवळीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

    December 20, 2025

    Entrepreneur Attacked Brutally : उद्योजकावर जीवघेणा हल्ला ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

    December 18, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.