साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथे १६ ते २० जानेवारी २०२४ पर्यंत झालेल्या आंतरराष्ट्रीय कथावाचक प.पू. पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या मधुरवाणीतून शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी लाखो भाविक चाळीसगावात येणार होते. त्यांच्या प्रवासाची सोय कुठेही कमी पडायला नको म्हणून अगदी पाचच दिवस हातात असतांना अचुक नियोजन आगारप्रमुख मयूर पाटील यांनी केले. त्यामुळे शिवमहापुराण कथेनिमित्त आलेल्या लाखो भाविकांसाठी प्रवासाचे ‘शिवधनुष्य’ सहजरित्या उचलुन दाखविले.
पाच दिवसात आगार प्रमुखांनी अगदी ॲक्शन मोडवर सर्व प्रशासन पर्यवेक्षकीय कर्मचारी, चालक, वाहक, यांत्रिक यांना विश्वासात घेऊन कार्यक्रमाची रणनिती आखली. त्यात विभाग नियंत्रक जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी बंजारा, वि.क.वर्ग. अधिकारी चित्ते, क्षीरसागर यांचे मार्गदर्शन मिळाले.
पाच दिवस चाललेल्या कथेनिमित्त सर्व चालक, वाहक, यांत्रिक प्रशासन यांनी आपापल्या नियाजित रजा रद्द करून कर्तव्य परमोधर्म असे समजुन आपले कर्तव्य बजावले. शिवमहापुराण कथेशिवाय नियोजित सर्व ग्रामीण, एलडी, एमएलडी नियते सुरळीत चालवून सुरु ठेवून प्रवाश्यांची गैरसोय झाली नाही. इतके अचुक नियोजन होते. या नियोजनात अथक परिश्रम आगाराचे वाहतूक नियंत्रक शुभम झगडे, राहुल पाटील, किरण काकडे यांच्यासह सर्व वाहतूक नियंत्रक यांनी घेतले.
त्यात सर्वात जास्त उत्साह आगार प्रमुख मयूर पाटील यांचा असल्याने त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी सर्व चालक, वाहक यांनी आपापली सुट्टी असुनही कर्तव्य संपलेले असुनही शिवमहापुराण कथेसाठी आलेल्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून पायाला भिंगरी बांधुन कर्तव्य बजावले. स्वत: आगार प्रमुख हे बस भरण्यापासून बस मागे घेण्याकामी मदत करत होते. शिवमहापुराण कथेच्या शेवटचा दिवस हा अत्यंत कठीण परीक्षेचा दिवस असुनही कुठेही कमी पडलो नाही. दुपारनंतर अशी परिस्थिती होती की, भाविक भक्तांसाठी बसेस पुरणार नाहीत. परंतु चाळीसगावच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमागे भगवंताची अदृश्य शक्ती आशीर्वादरूपी कामकरीता असल्यामुळे कोणतेही गालबोट न लागता शिवमहापुराण कथेच्या लाखो भाविकांची प्रवासाची सांगता आगार प्रमुखांनी सर्व कर्मचाऱ्यांना काँफी पाजुन गोड केली.
त्यात सर्वात मोलाचा वाटा होता यांत्रिक कर्मचाऱ्यांना पाच दिवसात एकही वाहन कमी पडू दिले नाही. चालक, वाहक, अधिकारी एक अतुट संगम कथेच्या निमित्त बघावयास मिळाला. त्यामुळे चाळीसगाव आगाराचे संपूर्ण विभागात नावलौकीक झाले.
