साईमत, पहूर, ता.जामनेर : वार्ताहर
येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील पाचवीची विद्यार्थिनी तथा शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू मोहिनी हरिभाऊ राऊत हिने पुणे येथे नुकत्याच झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदक मिळविले आहे.
पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या सहा खेळाडुंनी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सहभाग नोंदवत राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत एक कांस्य पदक पटकविले आहे. स्पर्धेत वृषाली पवार, श्रावणी लोहार, कार्तिक सोनवणे, वृषभ चौधरी, भावेश महाजन यांनीही उत्कृष्ठ सहभाग नोंदविला. त्यांना शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक-सचिव तथा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालये क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत, भूषण मगरे, ईश्वर क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडुंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
