साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील अल्पसंख्यांक विकास मंडळाची चाळीसगाव तालुक्याची कार्यकारिणी राज्याचे प्रदेशाध्यक्ष शोएब खाटीक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष मुराद पटेल यांनी नुकतीच जाहीर केली. लवकरच शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे मुराद पटेल यांनी सांगितले.
कार्यकारिणीत तालुका सचिवपदी अजिज खाटीक, तालुका कार्याध्यक्ष अलिम शेख, तालुका उपाध्यक्ष गफ्फार मलिक, उपाध्यक्ष अनिस शेख, पिंपरखेड, उपाध्यक्ष मुन्तजिम शेख, तालुका संघटक सलिम सैय्यद, कोषाध्यक्ष अल्ताफ खाटीक, खडकी, सहसचिव जावेद मुल्ला, वाघळी, सहसंघटक जावेद शेख, जामदा यांचा समावेश आहे.
