साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
भारत सरकारमार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या युजीसीच्या परीक्षेसाठी भारतातून १ हजार ६८९ विद्यार्थी बसले होते. त्यात अमळनेर तालुक्यातील बहादरवाडी येथील रहिवासी रोहित संतोष पाटील हा यूजीसी नेट, जेआरफच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याने हे यश अभ्यासाच्या जोरावर मिळवून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. तो निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष, पत्रकार तथा शेतकरी संतोष बाबुराव पाटील यांचा चिरंजीव आहे. तसेच अमळनेर येथील, सक्सेस अकॅडमीचे संचालक पवन संतोष पाटील यांचा लहान बंधू आहे.
रोहित हा सध्या लखनऊ, उत्तर प्रदेश येथे डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर केंद्रीय विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी, लखनऊ येथे एम.फार्म, ॲनालिसिस विषयात कार्यान्वित आहे. त्याला डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर, युनिव्हर्सिटी, लखनऊ येथील, एम फार्म.चे प्राध्यापक, प्राचार्य तसेच चोपडा आक्कासाहेब शरदचंद्रिका एम.फार्म कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक यांचेही मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल रोहितचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
