साईमत, बोदवड : प्रतिनिधी
येथील न.ह.रांका माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वार्षिक स्नेहमेळाव्यातून बोदवड येथील आत्मसन्मान फाउंडेशन संचलित प्रमिलाताई व मोहनराव फाउंडेशनच्या निवासी मनोरुग्ण सहाय्यता केंद्रास ४० हजार रूपयांची भेट दिली. गेल्या वर्षीही माजी विद्यार्थ्यांच्या गटाने बोदवड येथील जि. प. शाळेसाठी निधी भेट दिला होता.
गेल्या काही वर्षांपासून शालेय मित्रांचा दरवर्षी स्नेहमेळावा आयोजित केला जातो. यावेळी त्यांनी एकत्र येऊन एखादा सामाजिक उपक्रम हे सर्व मित्रपरिवार राबवितात. यावर्षी मनोरुग्ण सहाय्यता केंद्रास आर्थिक निधी व एक दिवस जेवण देऊन या सर्वांनी संक्रांत गोड केली. त्या दिवशी मनोरुग्ण केंद्रात शरद काळे आणि अविनाश मोते यांनी जेवण दिले. हा उपक्रम पार पाडण्यासाठी शरद भगवान काळे, प्रकाश काशिनाथ चौधरी, नितीन सारंगधर पाटील, प्रवीण कोल्हटकर यांनी व्यवस्थापन केले. यावेळी सुनील बडगुजर यांनी मित्र परिवरातर्फे आत्मसन्मान फाउंडेशनचे काम प्रशंसनीय असल्याने आम्ही हा निर्णय घेतला, असे मनोगत व्यक्त केले. यावेळी गोविंदा चौधरी, दीपक आहुजा यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होता.