साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
आदिशक्ती मुक्ताईच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या मुक्ताईनगर शहरामध्ये प्रत्येक घरामधुन देव पुजेनंतर निर्माल्य निघत असते. हे निर्माल्य कचरा गाडीमध्ये टाकू शकत नाही. ते नदीपत्रात टाकले जाऊन नदीपात्रात घाण होते. त्यामुळे निर्माल्य टाकण्याची सोय नसल्याने त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यासाठी तात्काळ निर्माल्य संकलन वाहन सुरु केल्यास प्रत्येक घरातील निर्माल्य जमा करण्यास मदत होईल. त्यामुळे निर्माल्य संकलनासाठी वाहन त्वरित सुरु करावे, अशा आशयाचे निवेदन शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर नगरपंचायत पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना यांना नुकतेच देण्यात आले.
निवेदन देतांना तालुकाप्रमुख छोटू भोई, उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, गणेश टोंगे, पंकज राणे, राजेंद्र हिवराळे, जितेंद्र मुरहे आदी उपस्थित होते.
            


