Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोरा तालुक्यात परिवर्तनाचा नारा : शिवसेना-उबाठाच्या ९ शाखांचे उद्घाटन
    पाचोरा

    पाचोरा तालुक्यात परिवर्तनाचा नारा : शिवसेना-उबाठाच्या ९ शाखांचे उद्घाटन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 18, 2024Updated:January 18, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    पाचोरा-भडगाव मतदारसंघात परिवर्तनाचा नारा बुलंद करत मैदानात उतरलेल्या शिवसेना-उबाठाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी गावोगावी शाखा उघडण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यांनी नऊ गावांमध्ये शाखांचे उद्घाटन केले. पाचोरा-भडगाव मतदारसंघात वैशाली सूर्यवंशी यांनी तगडे आव्हान उभे करतांना जनसामान्यांशी थेट संपर्क सुरू करतांनाच ‘गाव तिथे शाखा’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या अंतर्गत आजवर ७० पेक्षा जास्त शाखांचा प्रारंभ करण्यात आला. त्यांनी तालुक्यात नुकतेच शाखांचे उद्घाटन केले. त्यात प्रामुख्याने दुसखेडा, वडगाव खुर्द, हडसन व मोहाडी या गावांमध्ये प्रत्येकी एक तसेच पहाण, आसनखेडा गावात प्रत्येकी दोन तर नांद्रा गावात तीन शाखांचे उद्घाटन केले.

    प्रत्येक शाखेच्या ठिकाणी त्यांंचे ढोल-ताशांचा गजर आणि जोरदार जयघोषांमध्ये स्वागत करण्यात आले. त्यात तरूणाईसह महिला वर्गाचा विशेष सहभाग दिसून आला. शाखा हा आपल्या पक्षाचा आत्मा असून त्याच्या मजबुतीकरणाला प्राधान्य देण्याचे नमूद करतांनाच त्यांनी आगामी काळातील निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. प्रत्येक शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील जनतेच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याला आपले आद्य कर्तव्य समजावे, असेही त्या म्हणाल्या. आगामी काळात याच शाखांच्या माध्यमातून जनहिताची कामे करण्यात येतील, असे प्रतिपादन केले. उपस्थितांनी आवाहनाला प्रतिसाद दिला.

    याप्रसंगी वैशाली सूर्यवंशी यांच्यासोबत पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, तालुकाप्रमुख शरद पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक राजीव काळे परधाडे, सावकार दादा, सुनील पाटील, अमरसिंग पाटील, अशोक कुमावत, मनोज पाटील, खेडगाव नंदीचे सचिन पाटील, मुन्ना संघवी, अशोक पाटील, श्रीराम ढमाले, किरण पाटील, हडसन येथील देवा भाऊ, बापू पाटील, नितीन महाजन, संजय ठाकरे, अशोक महाजन, एकनाथ महाराज, आप्पा पाटील, विनोद बाविस्कर नांद्रा, आनंदा पाटील नांद्रा, राजू भैय्या, रवींद्र पाटील, कैलास पाटील, प्रवीण पाटील, हेमराज पाटील, समाधान पाटील, गफ्फार भाई, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल यांच्यासह समस्त ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    Pachora: पिंपळगाव हरेश्वरात किरकोळ वादातून तरुणावर बेशुद्ध हल्ला

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.