Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»शेअर्समध्ये गुंतवणुकीचे आमिष, जळगावात महिलेची १० लाखात फसवणूक,गुन्हा दाखल
    जळगाव

    शेअर्समध्ये गुंतवणुकीचे आमिष, जळगावात महिलेची १० लाखात फसवणूक,गुन्हा दाखल

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवले आणि त्यासाठी संबंधित कंपनीचे ॲप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगून दीपाली मकरंद चौधरी (३३, रा. विद्युत कॉलनी, जळगाव) यांची नऊ लाख ८२ हजार ५० रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    गृहिणी असलेल्या दीपाली चौधरी यांच्याशी २८ नोव्हेंबर २०२३ ते १६ जानेवारी २०२४ दरम्यान अभिलाषा, अल्बर्ट त्रिवेदी, अक्षय ठाकूर असे नाव सांगणाऱ्यांसह एका कंपनीच्या कस्टमर केअरच्यावतीने संपर्क साधण्यात आला. त्या वेळी चौधरी यांना एका कंपनीचे नाव सांगून त्या मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून मोठा नफा मिळण्याची बतावणी केली. त्यासाठी या महिलेला सदर कंपनीचे ॲप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांवर वेळोवेळी रक्कम स्वीकारली.
    बरेच दिवस झाले तरी नफा मिळणे दूरच मुद्दलही गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने चौधरी यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील नावे सांगणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon:जळगावात ८ मार्चला भव्य रक्तदान शिबिर

    March 7, 2026

    Muktainagar: मुक्ताईनगरची कन्या मोहिनी जगताप UPSC मध्ये मिळवते ऐतिहासिक यश

    March 7, 2026

    Jalgaon : जळगावच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून तब्बल ५.९५ लाख उकळले

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.