साईमत जळगाव जळगाव
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन जळगाव यांच्या वतीने आयोजित प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम अंतर्गत वेळेचे व्यवस्थापन यावर व्याख्यान कार्यक्रमात व्याख्याते म्हणून भगीरथ कौन्सिलचे संचालक समुपदेशक पंकज व्यवहारे बोलत होते. यावेळी त्यांनी जीवनात ४ डी महत्त्वाचे असल्याचे सांगितले व वेळेचे व्यवस्थापन यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे.डी.सी.सी. बॅकेचे बॅकिंग व्यवस्थापक सुनिल पवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आर.आर.पाटील , अतुल तोंडगांवकर, कर्मचारी युनियनचे हेमंत कुमार सांळुंखे, अनिल चौधरी, सुबोध सराफ, कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी उपस्थित होते.
यावेळी कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी मंडळाच्या योजना उपक्रम व कार्यक्रम बाबत पी.पी.टी. सादर करून कामगारांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी केले