‘आविष्कार-२०२४’ च्या अंतीम फेरीसाठी प्रकल्पांचे सादरीकरण

0
11

नाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित ‘आविष्कार-२०२४’ च्या अंतीम फेरीसाठी विविध संंवर्गातील एकूण १८० प्रकल्पांचे परिक्षकांसमोर सादरीकरण करण्यात आले आहे.

‘आविष्कार-२०२४’ संशोधन आंतरविद्यापीठ राज्यसतरीय संशोधन महोत्सवामध्ये १. मानव्यविद्या, भाषा व ललीतकला, २. वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, ३.विज्ञान, ४. शेती आणि पशुसंवर्धन, ५. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, ६. वैद्यक व औषध निर्माणशास्त्र या सहा संवर्गातील प्रत्येकी दहा प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणासाठी प्रत्येक संवर्गातील पदवीपूर्व (युजी), पदव्युत्तर (पीजी), निष्णात (पोस्ट पीजी, एम.फिल. /पीएच.डी.) अश्या तीन स्तरावर विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संवर्गातील प्रत्येकी दहा याप्रमाणे तीन स्तरातील एकूण १८० सहभागी स्पर्धकांनी संबंधित विषयातील तज्ज्ञ परिक्षकांसमोर प्रकल्पांचे प्रभावीरित्या सादरीकरण केले.

आविष्कार-२०२४ मध्ये राज्यातील २४ विद्यापीठांमधून सहभागी हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे भित्तीपत्रके, पोस्टर, मॉडेल, प्रतिकृती व दृकश्राव्यमाध्यम माध्यमात प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन विद्यापीठ मुख्यालयात मांडण्यात आले होते. प्राथमिक फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पोस्टर व मॉडेल यांची पहाणी करण्यात आली. प्रत्येक संवर्गात परीक्षणाच्या दुसऱ्या फेरीत सादरीकरणाव्दारे विद्यार्थ्यांची अंतीम फेरीसाठी निवड करण्यात आली. यामध्ये निवड झालेल्या सहभागी विद्यार्थ्यांचे प्रश्नोत्तरे व सादरीकरण यांचा आढावा घेऊन परीक्षण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर विविध विषयातील प्रकल्पांचे तपशीलवार माहितीच्याआधारे सुंदर सादरीकरण केले आहे.

आविष्कार-२०२४ मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रकल्प राज्यपाल यांच्या कार्यालयात नामांकित उद्योजकांच्यासमोर सादर करण्यात येतील. उद्योजकांनी प्रकल्पास प्रतिसाद दिल्यास नवसंशोधकांना सादरीकरणातील प्रकल्पाचा स्आर्टअप करता येईल असा प्रगल्भ दृष्टीकोन आविष्कार या उपक्रमामागे आहे.

विद्यापीठ मुख्यालयात दि. १५ जानेवारी २०२४ रोजी धन्वंतरी सभागृहात सकाळी ११ वाजता समारोप व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात अव्वल क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्याना बक्षीस व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here