साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्यपाल रमेशकुमार बैस यांच्या हस्ते ‘नवभारत के शिल्पकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये नुकतेच सन्मानित करण्यात आले. नाशिक विभागात अमळनेर नगरपालिकेला प्रथम आणि मुख्याधिकाऱ्यांना पुरस्कार असा दुहेरी सन्मान मिळाला आहे.
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पदभार घेतल्यापासून दरवर्षी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अमळनेर नगरपालिकेला उत्तम गुणानुक्रम मिळत आहे. सुरळीत पाणी पुरवठा, सौर ऊर्जा प्रकल्प राबवून वीज बिल कमी करणे, रस्त्यांची गुणवत्ता सुधारून रस्त्यांची वाढीव बिले कमी केली होती. नवोपक्रम आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवून अत्यावश्यक विकासकामे त्यांनी केली. कर्मचाऱ्यांना शिस्त, उत्तम प्रशासकीय कारभार राबविला म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार दिला.
याबद्दल मंत्री अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील आदींनी कौतुक केले आहे.