साईमत जळगाव प्रतिनिधी
खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल मध्ये दि. ११ गुरुवार रोजी शाळेत गणेशोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षिस वितरण शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुंवर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास शिक्षणाधिकारी मा.डॉ.किरण कुंवर, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, म.न.पा.शिक्षण विभाग अधिकारी दिपाली पाटील, संस्थेचे अध्यक्ष. प्रमोद चांदसरकर, मुखायाध्यापिका प्रिया सफळे, उपमुख्याध्यापक एस.पी.निकम, पर्यवेक्षक जे.एस.चौधरी, जेष्ठ कला शिक्षक एस.डी.भिरूडसर, गणेशोत्सव प्रमुख संगीता पाटील व गणेशोत्सव समिती सदस्य उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी डॉ.किरण कुंवर विद्यार्थांशी संवाद साधत म्हणाले की, जीवनात कोणतीतरी कला जोपासली पाहिजे म्हणजे जीवनात डिप्रेशन ला सामोरे जावे लागत नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगिता पाटील यांनी केले. बक्षिसांचे वाचन के.पी.पाटील.व आर डी.पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन आर.जी.सपकाळे यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
