साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शासनाने बेकायदेशीर लादलेली दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपयाचा दंडाचा नियम चालकांसाठी लागु केलेला आहे. हा नियम सर्व चालकांना मान्य नाही. त्या अनुषंगाने सर्व चालक (टेम्पो चालक, टॅक्सी, रिक्षा, क्रुझर, ट्रक, खासगी, टँकर, डम्पर चालक) हा नियम शासन जोपर्यंत माघार घेत नाही तोपर्यंत सर्व चालक स्टेरिंग छोडो आंदोलन करणार आहेत. त्यामुळे निवेदनाचा विचार करुन ‘हिट ॲण्ड रन’ कायदा मागे घेण्यात येऊन कष्टकरी चालकांना न्याय द्यावा, अशा आशयाचे निवेदन तहसिलदारांना दिले आहे. हे निवेदन त्यांच्यावतीने नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांना दिले. यावेळी संघटनेचे छोटू पहेलवान, मुकेश चौधरी, नाना चौधरी, अल्ताफ खान यांच्यासह सर्व चालक मालक, चालक उपस्थित होते.



