साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालयाच्या नुकत्याच झालेल्या आनंद मेळाव्यात बच्चे कंपनीने खरी कमाईचा अनुभव घेतला. स्काऊटच्या कब – बुलबुल विभागाचा उपक्रम उत्साहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन संस्थाध्यक्ष रामकृष्ण पाटील आणि शाळा समितीचे अध्यक्ष जितेंद्र वाणी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे उपाध्यक्ष योगेश अग्रवाल, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर, वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष सुरेश स्वार, मुलींच्या शाळेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप अहिरराव, संचालक मु.रा. अमृतकार, एच. एच. पटेल प्राथ. विद्यालयाचे अध्यक्ष अशोक बागड, सराफ इंग्लिश मीडियम स्कुलचे अध्यक्ष नीलेश छोरिया, क्रीडा समितीचे अध्यक्ष योगेश करनकाळ, शिक्षक प्रतिनिधी उपप्राचार्य डॉ. अजय काटे, मुख्याध्यापिका सुलोचना इंगळे, के.एन.तडवी, रमेश सोनवणे, सुनील पाटील, अविनाश घुगे आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत, मुख्याध्यापिका मंजुषा हरी नानकर, त्रिशला निकम यांनी केले. यशस्वीतेसाठी आनंद मेळावा प्रमुख सचिन चव्हाण, परेश चव्हाण, सचिन पाखले, दत्तात्रय गवळी, रोहित चव्हाण यांच्यासह शिक्षकांनी सहकार्य केले.
खाऊगल्लीत ३० स्टॉलचा सहभाग
शाळा परिसरात खाद्य पदार्थांचे स्टॉल असणाऱ्या खाऊगल्लीत बच्चे कंपनीने मौज केली. भेळ-पकोडी, पाणीपुरी, इडली-सांबर, ढोकळे, पाववडे अशा विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. दीड हजार विद्यार्थ्यांसह पालक-शिक्षकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्काऊटच्या उपक्रमातील खरी कमाईचा अनुभव घेतला. मेळाव्यात ३०हून अधिक स्टॉल लावले गेले.
मेळाव्यात कविता साळुंखे, ज्योती कुमावत, दीपाली चौधरी, स्मिता अमृतकार, रेखा चौधरी, मनिषा पाटील, माधुरी दायमा, तेजश्री जगताप, स्वप्ना चौधरी आदी शिक्षिकांनी स्वतः खाद्यपदार्थ तयार करुन स्टॉल लावले होते. संस्था पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. सूत्रसंचालन तथा आभार जिजाबराव वाघ यांनी मानले.