साईमत जळगाव प्रतिनिधी
आदिवासी विकास विभाग आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा सन 2023 – 2024 दिनांक ७ ते 9 जानेवारी दरम्यान नाशिक येथे झाल्या. सदर स्पर्धेत ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ मोहाडी अंतर्गत डोमगाव तालुका जळगाव आश्रम शाळेची आरती बाला बारेला (इयत्ता ८ वी) या विद्यार्थिनीने वर्षे 14 च्या आतील वयोगटात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील आदिवासी विकास विभाग आयुक्तालय अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या सर्व आश्रमशाळेतील विविध खेळांमधील जवळपास १८०० विद्यार्थी सहभागी झाले होते, पैकी वैयक्तिक खेळ प्रकार “लांब उडी” वयोगट वर्षे १४ च्या आतील आरती बाला बारेला इयत्ता ८ वी ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ मोहाडी अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा डोमगाव ता.जि. जळगाव येथील विद्यार्थिनी हिने राज्यात रजत पदक मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा गोटू सोनवणे, संचालक गणेश सोनवणे यांनी आरतीला राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक सुवर्ण पदक मिळाव अशा शुभेच्छा पर आशीर्वाद देऊन प्रोत्साहित केले. मुख्याध्यापक बद्रीप्रसाद जवाहरलाल चौधरी, अशोक शांताराम बोरसे यांनीही विद्यार्थिनीचे कौतुक केले तसेच क्रीडाशिक्षक तापीराम हिवराळे , विश्वेश चव्हाण, समाधान पाटील यांचेही तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कुमारी आरतीचे गोड कौतुक केले. व तिला राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
