साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे भागीरथीबाई पूर्णपात्रे कला, सीताबाई मांगीलाल अग्रवाल विज्ञान, कस्तुरबाई खंडू चौधरी वाणिज्य महाविद्यालय, केशव रामभाऊ कोतकर कनिष्ठ महाविद्यालय, चाळीसगावतर्फे आयोजित श्रीमती सीताबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीमती शकुंतलाबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. पूर्णपात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, चाळीसगाव यांच्या सहकार्याने होत असलेल्या ३८ व्या कै. गोपाळ नारायण उपाख्य भैय्यासाहेब पूर्णपात्रे स्मृती करंडक वक्तृत्व, श्रीमती सीताबाई मांगीलाल अग्रवाल स्मृती करंडक वादविवाद आणि नारायण अग्रवाल गौरवार्थ करंडक उत्स्फूर्त वक्तृत्व राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी, १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर (निशाणी डावा अंगठा कार) यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख होते.
यावेळी रमेश उत्रादकर यांनी मार्गदर्शनात जीवनात स्पर्धेचे महत्व सांगितले. तसेच मिलिंद देशमुख, डॉ. पूर्णपात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पूर्णपात्रे यांनी मनोगत व्यक्त करुन स्पर्धेच्या यशस्वीतेबद्दल समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी पाहुण्यांसह स्पर्धकांना संस्था आणि महाविद्यालयाची माहिती करून दिली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विनोद कोतकर (सचिव, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी), प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर (सहसचिव), सुरेश स्वार (चेअरमन, सीनियर कॉलेज कमिटी), राजेंद्र अग्रवाल (प्रायोजक शकुंतलाबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट), डॉ. सत्यजित पूर्णपात्रे (प्रायोजक डॉ. पूर्णपात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, चाळीसगाव), ज्येष्ठ संचालक मु. रा. अमृतकार, संचालक ॲड. प्रदीप अहिरराव, आनंदा वाणी, योगेश करंकाळ आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डी. एल. वसईकर, उपप्राचार्य डॉ. सौ. के. एस. खापर्डे, उपप्राचार्य प्रा. ए. आर. मगर, कार्यालयीन अधीक्षक हिम्मत आंदोरे, नागरिक, पत्रकार बांधव, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेचे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक डॉ. वीरा राठोड, सूत्रसंचलन डॉ. मनिषा सूर्यवंशी, प्रा. रवी पाटील तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अजय काटे यांनी मानले.



